Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजय देवगनच्या चित्रपटाने केली जबरदस्त कमाई !
    राज्य

    अजय देवगनच्या चित्रपटाने केली जबरदस्त कमाई !

    editor deskBy editor deskNovember 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट सध्या तरी अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज वर्तवला जात होता.

    मात्र दृश्यम 2 ने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच चकीत केलं. अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट या वर्षभरातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

    जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 15 कोटींपेक्षा जास्त कमाई करणं ही खूप चांगली बाब आहे. मात्र दृश्यम 2 हा चित्रपट रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ला मागे टाकण्यात अपयशी ठरली. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाची ओपनिंग कमाई ही जवळपास 36 कोटी रुपये इतकी झाली होती. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा पहिला चित्रपट ब्रह्मास्त्र तर दुसरा दृश्यम 2 ठरला आहे.

    राम सेतू- 15.25 कोटी रुपये
    भुल भुलैय्या 2- 14.11 कोटी रुपये
    बच्चन पांडे- 13.25 कोटी रुपये
    लाल सिंग चड्ढा- 11.70 कोटी रुपये
    सम्राट पृथ्वीराज- 10.70 कोटी रुपये
    विक्रम वेधा- 10.58 कोटी रुपये
    गंगुबाई काठियावाडी- 10.50 कोटी रुपये
    शमशेरा- 10.25 कोटी रुपये

    दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. 2015 मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला. सीक्वेलमध्ये अजय देवगण आणि अक्षय खन्नासोबत श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर यांच्या भूमिका आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.