जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रिंगरोडवरील उद्योगपती किरण बच्छाव यांच्या घरी बंदुकीच्या धाक दाखवून दरोडयाचा प्रयत्न झाला होता त्याप्रकरणी पोलीस पथकाने ७ संशयित आरोपी ताब्यात घेतले आहे.
१४ रोजी रात्री ९ वा. चे सुमारास किरण बच्छाव यांच्या घरी बंदुकीच्या धाक दाखवून दरोडयाचा प्रयत्न झाला होता. सदर घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी भेट दिली असता जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी जिल्हापेठ पो.स्टे. व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना समांतर तपासबाबत आदेश दिले होते.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोउपनिरी अमोल देवढे व पोउपनिरी गणेश चौबे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अमलदार अश्यांचे ४ पथके तयार करून गुन्हा उघडकिस आणण्या बाबत मार्गदर्शन करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरून संशयित आरोपी १) अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी, वय ३२, २) करण गणेश सोनवणे, वय १९, ३) यश उर्फ गुलाब सुभाष कोळी, वय २१, ४) दर्शन भगवान सोनवणे, वय २९, ५) अर्जुन ईश्वर कोळी (पाटील), वय ३१, ६) सचिन रतन सोनवणे, वय २५, ७) सागर दिलीप कोळी, वय २८ रा. दाजीबा चौक विदगाव ता.जि. जळगाव यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी यावर झालेल्या कर्जाला कंटाळून त्याने त्याचे गावातील इतर साथीदारांसोबत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. अशी कबुली दिली आहे.
तांत्रिक विश्लेषण पथक -पोउनि अमोल देवढे, पोह विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, संदिप सावळे, पोना किरण चौधरी, पोका लोकेश माळी, १ – पोउनि गणेश चौबे, पोह सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, राजेंद्र पवार, २ सफी रवि नरवाडे, पोह राजेश मेढे, पोह संजय हिवरकर, पोह लक्ष्मण पाटील, पोकों प्रमोद ठाकुर, ३ पोना प्रविण मांडोळे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, रविंद्र पाटील, ४ पोह अशरफ शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, दर्शन ढाकणे यांनी कामगिरी बजावली.