धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाळू माफियाचा धुमाकूळ सुरु होता याला लगाम लावण्यासाठी आता महसूल पथक कारवाईसह नदीपात्रात जाणऱ्या मार्गावरील चोरवाटा आता बंद करण्यात आल्या आहे.
बांभोरी येथील नदीपात्रात अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूमाफियांनी वाहतुकीसाठी चोर वाटा तयार केल्या होत्या याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांत वीनय गोसावी यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी अमोल पाटील तलाठी गजानन बिंद्वाल व कोतवाल नारायण सोनवणे यांनी जेसीबी द्वारे खड्डे खोदुन या वाटा बंद केल्या आहेत. खड्डे पुन्हा वाळू माफियांनी बुजल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिले आहेत.