जळगाव : प्रतिनिधी
‘असेल दृष्टी तर पाहू सृष्टी’ या उक्तीप्रमाणे हेरंब नेत्रालय जळगांव व नेरी येथील अनमोल परिवार च्या वतीने गावतील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सुंदर सृष्टी पहायची असेल तर दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे,निरोगी डोळे असणे हा सर्वांचा अधिकार आहे अन् हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तेव्हा नेरी बू.गावातील ११२ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती अनमोल परिवाराचे सदस्य किशोर आप्पा खोडपे,विवेक कुमावत,पवन वाघ यांनी दिली कार्यक्रम स्थळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर,सरपंच कल्पनाताई पाटील,उपसरपंच निलेश खोडपे,ज्येष्ठ नेते रमेश बापू पाटील,अशोक महाराज पाटील,राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्क्ष आशिष दामोदर,ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे, दत्ता इधाटे सर,सुकलाल बहुरूपे,सागर भदाने,गणेश कुमावत आदी ग्रामस्थ उपस्थित होते हेरंब नेत्रालय तर्फे डॉ.समाधान चौधरी, गोपाल माळी यांच्यासह ग्रामपंचयत नेरी बू!यांचे सहकार्य लाभले.