जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील महिलेची तब्बल ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील ३५ वर्षीय महिलेस दि १५ रोजी अनोळखी मोबाईल नंबरहून फोन आला समोरील महिलेने एका बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवत क्रेडीट कार्डचे मागील चार अंक विचारून महिलेची समती न घेता परस्पर खात्यातून ५० हजार ७७४ रुपये काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने सायबर पोलिसात धाव घेत संशयित आरोपीचा मोबाईल नंबर ८४४८४६९४१४ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नी.लीलाधर कानडे हे करीत आहेत.