अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. गंगापूर कायगाव रोडवर हा कार अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याआधी गुरुवारी रात्री उशिरा मुंबई-पुणे महामार्गावर कारची ट्रकला धडक बसली, यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले.
अपघातातील स्विफ्ट कारमधील मृत व्यक्ती बजाजनगर येथील आहे. सुधीर पाटील, रावसाहेब मोटे, रतन बेडवाल व अन्य 1 अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर वॅगनार कारधील 3 जखमी अमरावती येथील जंगले कुटुंब आहे. अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी कार (क्रमांक एम.एच.20 सी. एस. 5982) च्या चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (एम.एच.27 बी.झेड.3889) ला धडकली. औरंगाबाद कडे जाणाऱ्या कार मधील चौघे गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक चौरे, उपनिरीक्षक विलास घुसिंगे, डॉ. प्रशांत पंडूरे, रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ,सचिन सुराशे, अनंता कुमाव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कारच दरवाजे तोडून जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता; डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मृतांमधील तीघांची नावे समजली असून रावसाहेब मोटे (56) सुधीर पाटील (45) रा. वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (38 ) रा. वाळूज व इतर एकाचा मृत्यू झाला.