Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रागावलेल्या प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीहून ढकलले खाली…
    क्राईम

    रागावलेल्या प्रियकराने प्रेयसीला पाण्याच्या टाकीहून ढकलले खाली…

    editor deskBy editor deskNovember 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बीपीपो कर्मचारी असलेल्या मैत्रिणीला तिच्याच बॉयफ्रेंड असलेल्या अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ठार मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. यामध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मारहाण करत धक्का दिला आहे. त्यात ती सुदैवाने वाचली असली तरी तिचे मनके फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार 30 महीने तिला रिकव्हर होण्यासाठी लागतील अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या एका मित्राला पोलीसांनी जबाबासाठी बोलावले आहे.

    बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला चक्का पंधरा मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरुन ढकलुन दिले आहे.यामध्ये पीडित तरुणी ही गंभीर जखमी झाली असून तिचे मनके फ्रॅक्चर झाले असून तिला बरे होण्यासाठी कमीत कमी 30 महीने लागणार आहे.पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला पोलीसांनी अटक केली असून त्याच्या मित्राला देखील ताब्यात घेतले असून अधिकचा तपास केला जात आहे.पीडित तरुणीला कोकिलाबेन अंबानी या रुग्णालयात उपचार दिले जात असून तीची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.ही घटना रविवारी घडली असून तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर ही बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे.पीडित मुलगी आणि तीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर हे काही दिवसापासून सोबत राहत होते, दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेम होते, मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेलेले असतांना ही घटना घडली आहे.दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला होता, त्यात पीडित तरुणी 15 मजल्यावरील 18 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली होती. तिथे तिचा बॉयफ्रेंड आल्यावर दोघांमध्ये वाद झाला, वादात त्याने तिला मारहाण केली याच वेळी तिला त्याने जोराचा धक्का दिला त्यात ती पाण्याच्या टाकीवरवरुण छतावर पडली त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.