नवी दिल्ली ;- कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमेस्टर एकची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीची परीक्षा 6 डिसेंबरला संपले तर बारावीची परीक्षा 16 डिसेंबरला संपणार आहे.
दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. बारावीची परीक्षा दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा कालावधी 1.5 तास असेल. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटे देण्यात आली आहेत.