नवी दिल्ली वृत्तसंस्था ;– देशातील करोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,263 करोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासात 40,567 जण करोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 37,875 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील दर दिवशीच्या करोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. बुधवारी केरळमध्ये 30,196 नव्या रुग्णांची भर पडली तर 181 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची करोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्यांहून अधिक आहे.