धरणगाव प्रतिनिधी गौरव पाटील: तालुक्यातील विविध गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आज दि.17 रोजी सांयकाळी 5 वाजेला शाळा सुटल्यानंतर ही बस उपलब्ध न झाल्याने घटनास्थळी ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ व निलेश चौधरी यांनी बस आगार प्रमुखांशी चर्चा करून रात्री 7.30 वाजेच्या सुमारास बस आल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला होता.
शाळेत शिक्षण घेण्यासाठी धरणगाव तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी हे धरणगाव शहरात येत असतात, तालुक्यातील विद्यार्थी हे बसने प्रवास करीत असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्याची ओढ लागले असतांनाच बस वेळेवर न आल्याने विद्यार्थी कंटाळून जात असतात. गेल्या काही दिवसापासून किमान दोन ते तीन दिवस बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना बस स्थानकावर थांबून रहावे लागत असते. दि.17 रोजी 40 ते 50 मुली 5 वाजेला शाळा सुटल्यानंतर बसस्थानकावर येवून थांबलेले होते परंतु बिलखेडा – जुनोने वेळेवर न आल्याने काही पालकांनी धरणगाव शहरातील शिवसैनिकांना फोनवरुन याची माहिती दिली असता. बसस्थानकावर ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, पप्पू कंखरे, रवि जाधव, सुनिल चौधरी, गोपाल पाटील, आयस शेख, विनोद रोकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी धाव घेत बस आगाराशी संपर्क साधत त्वरीत बस उपलब्ध करून दिल्याने या मुलींना रात्री 7.30 वाजेच्या सुमारास बस आल्याने मुलींने आनंद व्यक्त केला आहे.