Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात अपमान सहन करणार नाही : मुख्यमंत्री शिंदे
    राजकारण

    राज्यात अपमान सहन करणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

    editor deskBy editor deskNovember 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशाराच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

    एका आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला. वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं. वीर सावरकरांचा हा अपमान सहन केला जाणार नाही. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    या विधानाने उडाली खळबळ ?
    सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींवर परखड भाषेत टीका केली होती. या विधानावरून राज्यात आता खळबळ उडाली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.