Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोली उपसरपंचपदी सौ. सकुबाई पाटील बिनविरोध
    जळगाव

    शिरसोली उपसरपंचपदी सौ. सकुबाई पाटील बिनविरोध

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली प्र.न.येथिल उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतमध्ये सौ. सकुबाई मिठाराम पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

    शिरसोली प्र.न. येथिल ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १७ आहे. ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास आठ महिन्याच्यावर कार्यकाळ संपला आहे. सरपंचपद हे अनुसुचित जमाती पुरुष राखीव असल्याने १७ फेब्रुवारी रोजी सरपंचपदी हिलाल मल्हारी भिल्ल तर उपसरपंचपदी श्रावण शंकर ताडे यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंच ताडे यांनी ठरल्याप्रमाणे ६ महिने उपसरपंचपदाचा कार्यकाळ साभाळला त्यानंतर त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल यांच्याकडे देऊन २३ ऑगस्टरोजीच्या ग्रा.प.च्या मासिक सभेत मजुर करण्यात आला. रिक्त असलेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी ठरल्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मिठाराम आनंदा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. सकुबाई मिठाराम पाटील यांची आज दुपारी २ वाजता उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी १७ सदस्यांपैकी १६ सदस्य उपस्थित होते. तर १ सदस्य गैरहजर होते.

    यावेळी माजी उपसरपंच श्रावण ताडे, ग्रा.प. सदस्य रामकृष्ण काटोले, शशिकांत अस्वार, विनोद अस्वार, गौतम खैरे, मुद्दसर पिंजारी, भगवान पाटील, श्रीमती द्वारकाबाई बोबडे, श्रीमती भागाबाई ताडे, श्रीमती पुष्पलता सोनवणे, सौ. शारदा पाटील, सौ. ज्योत्स्ना पाटील, सौ. मिनाबाई बोबडे, सौ.जमुनाबाई साबळे, उपस्थित होते. तर निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी सुनील दांडगे, नाना पाटील, वना बारी, उमेश महाजन यांनी पार पाडली.

    नवनिर्वाचित उपसरपंचांचे शेनफडू ( आबा ) पाटील, वासुदेव बोरसे, सुभाष अस्वार, भगवान बोबडे, गोकुळ ताडे, नाना हवलदार, संजय सुर्यवंशी, उमाजी पानगळे, घनश्याम काटोले, सुनिल माळी, बशिर पिंजारी, सईद पिंजारी, चंद्रशेखर काळे, पिरण खर्चे, संजय खैरनार, बापू सोनवणे, उत्तम खर्चे, सुनिल बारी तर शिरसोली प्र . बो . येथील माजी प स सभापती नंदलाल पाटील , सरपंच प्रदीप पाटील , मुरलीधर ढेंगळे यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दिवसाढवळ्याची हत्या; नवऱ्यासह बायकोने बॉयफ्रेंडला संपवलं !

    March 5, 2026

    “पवारांच्या उमेदवारीनंतर सुळे ‘मातोश्री’वर; ठाकरे कुटुंबाचे मानले आभार”

    March 5, 2026

    राज्यसभा रणांगण तापले : शरद पवारांसमोर एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; शिवसेनेचे दोन उमेदवार?

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.