भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ७५ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध बँकेत असतांना अनोळखी इसमाने रोकड लांबविल्या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिवाजी नगरातील रहिवासी नामदेव शंकर पाटील(वय ७५) हे भडगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेत गेले असतात त्या ठिकाणाहून अनोळखी व्यक्तीने वृद्धाच्या हातातील पिशवीतून ४५ हजार रुपयांची रोकड उडविल्याची घटना दि १६ रोजी भर दुपारी घडली होती, या प्रकरणी भडगाव पोलिसात धाव घेत तत्काळ अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.संजय काळे हे करीत आहेत.