धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून सेटिंगच्या प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहातील स्वामी समर्थ नगरातील सुरु असलेल्या मंदिराचे बाधकाम ठिकाणाहून गणेश महाजन यांच्या मालकीच्या सेटिंगच्या प्लेटा ४४ नग किमान १७ हजार ५०० रुपये किमतीच्या अनोळखी इसमांनी चोरून नेल्याची घटना दि २० सप्टेबर २०२२ रोजी घडली. या प्रकरणी गणेश महाजन यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.