मुंबई : वृत्तसंस्था
दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मेटे यांच्या अपघात प्रकरणी सीआयडीने चौकशी केली आहे. त्यानुसार त्यांनी मोठी कारवाई केली आहे.
विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला होता. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते. वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती. ‘विविध सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यात आले आहेत,’ त्यावरुन सीआयडीने ही कारवाई केली आहे. एकनाथ कदम याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे समजते. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ही घटना घडली होती. विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं. त्यावेळी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती.