चाळीसगाव : प्रतीनिधी
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका परिसरात बंद घर पाहून चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करीत घरातील तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल घेत पोबारा केला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मेहुणबारे येथील नवेगावातील रहिवासी विमलबाई पुंडलिक निकम हे गावी गेले असतांना अनोळखी इसमांनी दि १४ रोजी मध्यरात्री घरातील लोखंडी दरवाजाचे कडी कोयडा तोडून घरातील गोदरेज कपाटातील १ लाख ५० हजार रुपये रोख तर ५६ हजार रुपयाचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरेश अभिमन काकनदे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.विष्णू आव्हाड हे करीत आहेत.