Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी व चारचाकी अपघातात २ ठार तर ६ जखमी
    क्राईम

    दुचाकी व चारचाकी अपघातात २ ठार तर ६ जखमी

    editor deskBy editor deskNovember 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    शहरातून धुळेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी ओमनी गाडीने धरणगावकडून चोपड्याकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ओमनी गाडीतील बसलेले सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ घडली. गंभीर जखमीपैकी एकाला जळगावला हलविण्यात आले आहे. तर दुचाकी वरील दोन्ही मयत चोपडा शहरातील रहिवाशी आहेत.

    ओमनी गाडी क्रमांक-एमएच-१८डब्ल्यू ७९८७ ही सहा प्रवाशांना घेऊन रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने चोपडयाकडून धुळेकडे जात होती. यावेळी कॉन्ट्रॅक्टर असलेले अकसर इरफान काझी (४८) रा. दर्गाअळी चोपडा शेख अनिस शेख जुहूर (४६) रा. मण्यारअळी चोपडा हे दोन्ही जण दुचाकी क्रमांक-एमएच १९ सीएल- ७२४१ वर धरणगाव येथील कामे आटोपून रात्रीच चोपड्याकडे येत होते.

    दरम्यान मजरेहोळ फाट्या जवळ समोरून धुळेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ओमनी क्रमांक -एमएच-१८ डब्ल्यू ७९८७ या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली यावेळी झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीवरील अकसर इरफान काझी व शेख अनिस शेख जुहूर हे दोन्ही जण जागीच ठार झाले तर अपघातात ओमनी गाडी देखील पलटी झाल्याने गाडीतील प्रवाशी सागर साहेबराव पानपाटील (२७),राहुल अनिल घोडे (३०),अविनाश युवराज बोरसे (३०),दीपक मारुती धतेले (३०),आकाश राजाराम सावळे (२८) सर्व राहणार वाडीभोकर ता.जि.धुळे,अजय मगन मोरे (३०),राहणार नकाने ता.जि.धुळे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

    अपघाताची खबर मिळताच शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षकअजित साळवे,पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे,पोना.ज्ञानेश्वर जवागे, पोना.मधुकर पवार,पोना.शेषराव तोरे,पोना. संतोष पारधी,पोना.संदीप भोई,पोकॉ.सुमेर वाघेरे पोकॉ.सुनील बच्छाव,पोकॉ.रवी पाटील आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठून अपघातात दोघा मयतांना व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ.नरेंद्र पाटील यांनी वरील अकसर इरफान काझी,शेख अनिस शेख जुहूर यांना मयत घोषित केले. याबाबत शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !

    November 18, 2025

    खळबळजनक : मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह !

    November 18, 2025

    जळगावात ५२ वर्षीय प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय !

    November 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.