मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री गरोदर होत असतानाचे सर्वच फोटो व्हायरल होत आहे, तर त्यांची डिलिव्हरी कशी झाली काय झाली हि चाहत्यांना उस्तुकता लागून असते, पण सोनम कपूर आणि पती आनंद आहुजा यांनी नुकतच पहिला मुलगा वायू ला २० ऑगस्ट रोजी जन्म दिला. जिथे बहुतांश अभिनेत्रींची सी. सेक्शनने डिलिव्हरी झाली तिथे सोनमची नॉर्मल डिलेव्हरी कशी झाली? असा अनेकांना प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वतः सोनमने सोशल मीडियावर दिलं आहे.
सोनमने आपल्या संपूर्ण प्रेग्नंसीचा एक्सपिरीयन्स सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात तिनं सांगितलं की, तिला मुल नैसर्गिक पद्धतीने जन्माला घालायचं होतं. म्हणून तिच्या डॉक्टर गौरी मोथा यांच्या मार्गदर्शनात तिनं ‘जेंटल बर्थ मेथड’ अवलंबली. यावर त्यांनी एक पुस्तक लिहीलं आहे. ‘जेंटल बर्थ मेथड’ ही डॉ. मोथा यांनी डिझाइन केलेली पध्दत आहे. गर्भवती महिलेने आरामात, शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने बाळ जन्माला घालावं, हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं. या पद्धतीने तुम्ही पुर्ण सकारात्मकतेने मुलाला जन्म देऊ शकतात. याची प्रक्रीया बरीच लांबलचक आहे. यात १८ आठवडे शुगर फ्री खावं, गर्भावस्थेत नियमित योगा आवश्यक आहे.