जळगाव : प्रतिनिधी
हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज शिवसेनेने (ठाकरे गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी आम्ही कोणतेही बाबा म्हणायला तयार, पण धरणगावकरांना पाणी द्या, अशा शब्दात पालकमंत्र्यांवर टीका केली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी कधी नव्हे ते आताच दबावाखाली काम करत असल्याचा आरोप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केला आहे. यावेळी रमेश पाटील, शरद माळी, धीरेंद्र पुरभे, राजेंद्र ठाकरे, राहुल रोकडे यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित आहेत.