जळगाव ;- जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील २९ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
बँकेच्या वतीने क्रांतीकारी देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी ठोठावलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आधारित सेल्युलर जेल च्या देखाव्याचे भव्य सादरीकरण देखील करण्यात आले होते.
या वर्षीची कोविड विषाणूजन्य परिस्थिति लक्षात घेता साध्या पद्धतीने देखावा सादर करण्यात येणार असून बँकेचे सभासद व ग्राहक यांचेसाठी विविध विषयांवर आधारित ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात या वर्षीची कार्यकारणी व समित्यांची स्थापना करण्यात आली.
सल्लागार समिती : सर्वश्री अनिल राव,डॉ.प्रताप जाधव, भरतदादा अमळकर, संजय बिर्ला, दीपक अट्रावलकर, विवेक पाटील, सतीश मदाने, डॉ.सौ.आरतीताई हुजूरबाजार, सौ सावित्रीताई सोळून्खे, जयंतीलाल सुराणा, हरिश्चंद्र यादव, सुरेश केसवाणी, सुभाष लोहार, डॉ.अतुल सरोदे, नितिन झवर, सौ लताताई इंगळे,रविंद्र बेलपाठक,बन्सिलाल अंदोरे,कृष्णा कामठे, जयेश दोशी, पुंडलिक पाटील, रत्नाकर पाटील, संजय नागमोती, सुनील अग्रवाल,बापूसाहेब महाले , हेमंत चंदनकर, ओंकार पाटील , कपिल चौबे, नितिन चौधरी, पंकज पाटील
कार्यकारणी : अध्यक्ष : सर्वश्री गिरीश टाकणे, उपाध्यक्ष : ऋषिकेश डावरे, कार्याध्यक्ष : महेश सावदेकर, सचिव : वैभव दाणी, कोषाध्यक्ष – योगेश तारे सह.सचिव : धिरज ढाकेकार्यकारणी सदस्य : सर्वश्री गिरीश कुरकुरे, प्रमोद पाटील, अमोल लंगरे, रूपेश देशमुख, नचिकेत पेठकर, रमेश सोनार,ज्ञानेश्वर पाटील, कु.प्रियंका भारती, सौ प्रियंका झोपे,कु.आश्विनी राठोड, सौ स्वाती भावसार, दिनेश ठाकरे, जयदीप शाह, भानूदास येवलेकर, शिवाजी कुमावत, ज्ञानेश्वर खोरे.
केशवस्मृति सेवा संस्था समूहातील सर्व सदस्यांचा देखील यात सहभाग असणार आहे.
दि.१० सप्टेंबर २०२१ पासून सुरु होणा-या गणेश उत्सवात भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.