औरंगाबाद : वृत्तसंस्था
कामानिमित दुसऱ्या जिल्ह्यात विटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी आलेल्या पवार कुटुंबियांच्या परिवारावर आज दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. एकाच वेळी दोघी बहिणींचं निधन झाल्यानं कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. तर, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील परशुराम पवार हे कामानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात आले होते. ते गोरख पवार यांच्या विटभट्टीवर मोलमजुरी करून मुली व परिवारासह राहत होते. सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास काजल आणी मीनाक्षी दोघी बहिणी सायगव्हाण येथील छोट्या पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
कपडे धुण्यासाठी पाझर तलावात गेल्या असताना दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणीचा पाण्यात पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परीसरात घडली आहे. काजल परशुराम पवार (वय १५ वर्षे), मीनाक्षी परशुराम पवार (वय १३ वर्षे, रा. होळणांथा ता. शिरपूर जि. धुळे) अशी पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत. दरम्यान पाय घसरून दोघीही तलावच्या पाण्यात पडल्या पोहोता येत नसल्याने व आजूबाजूला कुणीही वाचविण्यासाठी नसल्याने दोघीही बुडाल्या. बराच वेळ झाल्या तरी मुली अजून घरी न आल्याने पवार तलावाच्या दिशेने निघाले. त्यानंतर समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला पहिल्या नंतर घटना समोर आली . गावकरी व पोलिसांच्या मदतीने दोघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. शवविचेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या तब्यात देण्यात् आले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.