एंरडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील एक बस चालक आपले कर्तव्य बजावीत असतांना त्यास एकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील विखरण येथील रहिवासी असलेले साहेबराव महाजन(वय ४३, नोकरी – बसचालक) हे एंरडोल ते उत्राण येथे बसने प्रवासी वाहतूक करीत असतांना दि १४ रोजी दुपारी एस.टी.बस.क्रमाक एम.एच.०६.एस.८६२३ याने ते भातखेडा बसस्थानकावर आले असता त्यांच्या बसमागून येत बसचालक महाजन यांना संशयित आरोपी गोसावी याने खाली उतरवीत माझ्या दुचाकीस कट कसा मारला असा जाब विचारत असताना त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याने बसचालक महाजन यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलिसात सरकारी कर्मचारीस मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.नीता कायटे हे करीत आहेत.