पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका शिवारातील शेतामधून हजारो रुपयांच्या कपाशीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील दहीगाव संत येथील रहिवासी गोकुळसिंग इंद्रसिंग पाटील(वय ७०) यांच्या मालकीची शेत दहीगाव संत शिवारात आहे, त्यांच्या शेतातील १० क्विंटल कपाशी यासह सोलर बटरी, व शेतात लागणारे उपयुक्त औजारे यांची एकूण किमत ८९ हजार रुपये अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि १३ रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी त्यांनी पाचोरा पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.सचिन पवार हे करीत आहेत.