जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात ११ नोव्हेंबर पासून एग्रोवन कृषी प्रदर्शन सुरू झालेले आहे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी भेट दिली या प्रदर्शनात सुमारे 250 हुन अधिक स्टॉल्स आहेत.
सध्या शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई खूप भासत आहे. जादा मजुरी देऊनही अंग मेहनतीचे कामे असल्याने मजूर मिळत नाही, याला पर्याय म्हणून कमी मजूर लागणारी पिके व मजुराला पर्याय म्हणून यंत्र व अवजारे यांचे स्वतंत्र दालनाला प्रतापराव यांनी भेट दिली. शेती हा बिन भरवशाचा व्यवसाय झालेला असल्यामुळे शेतमालाला भाव मिळेल याची शाश्वती देता येत नाही यामुळे विविध प्रकारच्या फळभाज्या, भाजीपाला, बांबू सुबाभूळ, यांच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांकडून त्यांनी माहिती घेतली. भूजल पातळी खालावत असल्यामुळे पाण्याची उपलब्धता आणि पावसाचा अनियमितता यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठा त्रास सुरू आहे त्यांच्यापासून संरक्षण देणारे झटका मशीनचा डेमो त्यांनी पाहिला. राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना तसेच बँक कर्जाबाबत माहिती घेतलं कमी श्रमात कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न उत्पादन देणाऱ्या अपारंपारिक पिके शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे असे विचार जिप सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी मांडले आणि शेतकऱ्यांना हे प्रदर्शन आवर्जून पाहावे असे आवाहन त्यांनी केले.