• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

editor desk by editor desk
November 14, 2022
in राजकारण, राज्य
0
राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील

मुंबई : वृत्तसंस्था 

मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ सादर करत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करतोय, हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

ठाण्यातील वाय ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला. उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय? यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती आहे, असं वाटत नाही. विशेषतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याचे अर्थ लोकांना काय समजायचे, ते समजतात.
गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांच्यावर लक्ष केंद्रीत करून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. पक्ष त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, सरकार येतात आणि जातात, कुणाचा किती विचार केला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनीही एक मर्यादा ठेवून काम करावं, अशी टिप्पणी जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट असं राजकीय वातावरण ठाण्यात तापलं आहे. ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात हे षडयंत्र रचल्याचा आरोप आव्हाड गटातर्फे करण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकारी आरोप काय करतात, थेट ३५४ चा गुन्हा दाखल करतात, हे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्यांसाठी फार मोठा शॉक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही. त्या महिलेने २४ तासानंतर तक्रार का केली? थेट विनयभंगाचा गुन्हा? एखाद्याला तुम्ही जीवनातून उठवायचं ठरवलंय का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय.

Previous Post

महिलेने घेतली मुख्यमंत्र्याची भेट अन आ.आव्हाड देणार राजीनामा?

Next Post

फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळअपघात ; एक ठार एक जखमी

Next Post
फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळअपघात ; एक ठार एक जखमी

फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळअपघात ; एक ठार एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group