स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव जिल्ह्यात घरफोडी, दुकान फोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम.राज कुमार व अपर चाळीसगाव पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना त्याप्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि. १३ रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील मिथुनसिंग मायासिंग बावरी याने पाळधी ता, धरणगाव येथील एका पज्याचे दुकानाचे कुलूप तोडून त्यातील मोबाईलव इतर चार्जिंगवस्तु चोरी केल्या असून त्यातील रियलमो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट त्याचे ताब्यात असून तो मोबाईल तो वापरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी. किसन नजनपाटील यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेको लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक पाटील, पीना किशोर समराज राठोड, पोकों विनोद सुभाष पाटील, चापोकों मुरलीधर सखाराम बारी यांचे पथक तयार करून त्यांना कजगाव ता भडगाव येथे रवाना केले असता आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी वय ३२ रा कजगाव ता. भडगाव हा कजगाव येथे मिळून आल्याने त्याचे कडून धरणगाव पोलीस स्टेशन गुर नं. २२६ २०२२ भादवि ४६९,३८० या गुन्हयांतील चोरी झालेला ५,५००/- रु. किमतीचा ०१ मोबाईल हेण्डसेट त्याचे कब्जात मिळून आल्याने सदर मोबाईल हॅण्डसेट बाबत आरोपीस अधिक विचारपुस करता त्यांनी पाळधी गावातील एक दुकानाचे कुलूप तोडून त्या दुकानातून चोरी केल्याचे सांगितले आहे. वरील गुन्हयांतील जप्त केलेला मोबाईल हॅण्डसेट व आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी वय ३२ रा. कजगाव ता. भडगाव यास पुढील तपास कामी धरणगाव पो स्टेच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.