जळगाव ;– 8 सप्टेंबर जागतिक फिजीयोथेरेपी दिनाचे औचीत्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात फिजीयोथेरेपी दिवस साजरा करण्यात आला.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शारिरीक बाधा व व्यंग असलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिजियोथेरेपी सेवा सुरु करण्यात आली असून, सदर सेवेच्या माध्यमातून दिव्यांग बालकांच्या विकासासाठी फिजीयोथेरेपी सेवा अंत्यत प्रभावी असून त्यामाध्यमातून त्यांचे व्याधीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होत आहे. दिव्यांग मुलांच्या विकासासाठी फिजियोथेरेपी व फिजीयोथेरेपीस्ट यांची भुमीका अत्यंत मोलाची ठरत आहे. हेच महत्व लक्षात घेऊन आज दिन विशेषाच्या निमीत्ताने फिजीयोथेरेपी देणा-या तज्ञांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, मानद सचिव श्री. विनोद बियाणी, समाज कल्याण विभागाचे श्री. भरत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दिन विशेषाच्या प्रसंगी डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेजचे डॉ. निखील पाटील, डॉ. तेजस्वीनी वाणी यांनी फिजीयोथेरेपीबाबत महत्व विषद करुन दिव्यांग मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले. तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांना प्रेरणा देत अशा मुलांच्या विकासासाठी सर्वतोपरीने प्रोत्साहन प्रोत्साहन दिले जाईल अशी ग्वाही दिली. रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव श्री. विनोद बियाणी यांनी सर्व फिजियोथेरेपीस्ट यांना शुभेच्छा देत दिव्यांग बालकांच्या विकासासाठी जिल्ह्यात अत्याधुनीक असे फिजीयोथेरेपी केंद्र अदययावत करण्यात येईल व अधिकाधिक दिव्यांग बालकांना अत्याधुनीक अशी फिजीयोथेरेपी सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.
दिन विशेषाच्या निमीत्ताने डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरेपी कॉलेजचे फिजियोथेरेपीस्ट डॉ. निखील पाटील डॉ. तेजस्वीनी वाणी डॉ. स्नेहा तिवारी, कुणाल सावंत, चिन्मय वाणी, उत्कर्ष देशमुख इ. तज्ञाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मानसोपचार तज्ञ श्रीमती. सुवर्णा चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे अधिकारी श्री. भरत चौधरी यांनी केले तसेच श्री. शोएब शेख, मनोज वाणी, समाधान वाघ यांचे कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य केले.