रावेर : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांची घरे वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी फैजपूर प्रांत कार्यालय दिनांक १५ मंगळवार रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जमीन याचीकेत क्र 2/ 2022 दि 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हाभरात गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही जिल्हाभरात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील 9 गावांमधील 620 अतिक्रमण धारकांना तहसीलदाराच्यावतीने जागा खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली असून पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे . सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत राहात असून रहिवासाच्या कामे ती जागा वापरत आहे तसेच हे सर्व अनुसूचित जती -जमाती अल्पसंख्यांक भटके विमुक्त ओबीसी या प्रवर्गातील आहेत भूमिहीन कामगार मजूर वर्गातील आहे.
बैठकीला मार्गदर्शन करतानां शमिभा पाटील यांनी वंचित बहुजन आघडी हि केवळ पोकळ आश्वासन न देता निर्णायक भुमिका घेते यामुळे गेल्या प्रस्थापित राजकारणी व गल्लीबोळातले राष्ट्रीय अध्यक्षांनी धसका घेतला असुन कार्यकर्ता व स्थानिकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करत आहेत तरि, याला बळी पडू नका हा लढा केवळ इथपर्यंतच लढायचा नसून तो आ. बाळासाहेबांच्या भूमिकेला अनुसरून न्याय मिळेपर्यत कोर्टात जनहित याचिका दाखल करणे. व बाधितानां न्याय मिळवून देईपर्यंत लढणार आहोत . असे सांगितले
या गावांमध्ये गेल्या दोन दिवसात शमिभा पाटील व कार्यकर्त्यांनी बैठकी घेऊन लोकांची संवाद साधला असुन. मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे मोर्चा अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शमीभा पाटील राज्य कार्यकारणी सदस्य वंचित बहुजन युवा आघाडी तसेच , जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी विनोद सोनावने,बाळूभाऊ शिरतुरे, रफिक बेग समाधान भिल, राजेंद्र अवसरमल ज्ञानेश्वर कोळी, संदीप सवरणे, राहुल गाढे, नरेंद्र करवले, असे आवाह न संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. मोर्चा बांधणी व यशस्वीतेसाठी प्रतीक दामोदरे,अजय तायडे, कुलदीप तायडे, अजय भालेराव, सुमित सवरने, निलेश दामोदरे, हे युवा जबाबदारी सांभाळत आहे.