मुंबई : वृत्तसंस्था
शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी ठाकरे गटाला दूर करत शिंदे गट स्थापन करून राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर त्यांनी राज्यातील ठाकरे गटातील नेते व कार्यकर्ते आपल्या गटात सामील करून घेतले होते. तर उद्या म्हणजेच सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे. भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान सय्यद यांच्यासह १ हजार कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही शिंदे गटाने मोठं खिंडार पाडलं आहे. शिवसेनेचे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफान सय्यद कार्यकर्तेसह शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
उद्या (सोमवारी) आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश होणार आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर इरफान सय्यद यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. इरफान सय्यद हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मोठे कामगार नेते आहे. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्तेही शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांचे पती वैजिनाथ वाघमारे हे ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर आज दुपारी 1 वाजता अभिनेत्री दीपाली सय्यदही पक्षप्रवेश करणार आहेत.