Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातून मोठा प्रकल्प परराज्यात !
    Uncategorized

    राज्यातून मोठा प्रकल्प परराज्यात !

    editor deskBy editor deskNovember 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातून गेल्या काही महिन्यापासून दोन प्रकल्प बाहेर गेले आहेत तर आजही एक प्रकल्प बाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात मध्य प्रदेश सरकारने बाजी मारली आहे. मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाला तसे पत्रही केंद्र सरकारने पाठवल्याचे समजते.

    वेदांता – फॉक्सकॉन, टाटा – एअरबस, बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा प्रकल्प गेल्याने पुन्हा एकदा राज्यात आरोप – प्रत्यारोपाला धार येणार आहे.

    केंद्रातल्या भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यात पाच वर्षांसाठी या झोनला तब्बल 400 कोटी रुपये मिळणार होते. याची अधिसूचना 13 एप्रिल 2022 रोजी काढली गेली. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची शेवटची तारीख ही 8 जून 2022 होती. या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे हा प्रकल्पही उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर केल्याचा खुलासा शिंदे – फडणवीस सरकारने केला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि तमिळनाडू ही राज्ये स्पर्धेत होती. महाराष्ट्राकडून एमआडीसीने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.