जळगाव I प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॉक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगरातील रोटर भवन येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षिका किरण गांधी यांनी मूर्ती कशी बनवावी, शाडू मातीचे फायदे, प्रदुषणाचा धोका याविषयी मार्गदर्शन केले. सहभागी 86 विद्यार्थ्यांना रोटरी वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, मानद सचिव अनुप असावा, प्रेसिडेंट इलेक्ट सुनील सुखवाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी रोटरॉक्ट जळगाव वेस्टचे अध्यक्ष नेहा कोठारी, सचिव जागृती भागवानी, प्रोजेक्ट चेअरमन वैभव अबोटी, सचिन पटेल, अमृत्त मित्तल, धीरज फटांगळे, प्रतिक वाणी, वेदांत खाचणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.