लाईव्ह महाराष्ट्र न्यूज
जळगाव शहरातील होणा-या मंदीराचे साहीत्य चोरीच्या घटना वाढल्याने चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी अशांनी केलेले मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त माहितीनुसार की जिल्हापेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन ६०८ / २०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता. सदर गुन्हयात गजानन नगर जळगाव येथिल जागृत महादेव मंदीराचे साहीत्य चोरी झालेले असुन ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव येथे राहणारा याने केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.
त्यानुसार त्याचा शोध घेवुन योग्य ती कारवाई करा असे कळवील्या वरून पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, अविनाश देवरे, हरीष परदेशी सर्व नेमणुक स्था.गु.शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने रेल्वे स्टेशन मागील पुलाखालून ताब्यात घेतले आहे आरोपी नामे सुरेश बबनराव केवारे वय ६५ मुळ रा. खामगांव बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशन मागे जळगांव यांस गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन जळगांव शहरातील आणखी काहीचोरीच्या घटना उघड होऊ शकतात तसेच वरील आरोपीतांस यापुर्वी जळगांव शहर पोस्टे मंदीर साहीत्य चोरीच्या गुन्हयात १ वर्ष शिक्षा झालेली आहे.