जळगाव : प्रतिनिधी
दारू पिऊन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून करणाऱ्या चोपडा तालुक्यातील शेवरे बुद्रुक येथील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शेवरे बुद्रुक ता चोपडा येथील नारायण केऱ्या भिलाला वय ४० हा २८ मार्च २०२१ रोजी रात्री आपली पत्नी गणुबाई नारायण भिलाला वय ३५ हिच्यासोबत नेहमीप्रमाणे दारू पिऊन भांडण करत होता. व दोन्ही रात्री घरात झोपले होते. त्याची मुले बाहेर झोपली होती. २९ मार्च २१ सकाळी ६ वाजता मोठा मुलगा निलेश हा पाणी प्यायला उठला असताना त्याला त्याची आई खाटेवर झोपलेली दिसली आणि तिच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते ,तिचा जोरजोरात श्वास सुरू होता. आणि तिच्या डोक्यावरही जखम झालेली होती.
निलेश ने आईला विचारण्याचा प्रयत्न केला असता ती काहीच बोलली नाही. वडिलांना याबाबत विचारले असता त्यांनी उलटी कुऱ्हाड मारल्याची कबुली दिली. आईला दवाखाण्यात नेण्यासाठी गावात वाहन नव्हते. जवळच्या खिर्डी गावातून रिक्षावाला बोलावला. तो दुपारी बारा वाजले होते. तिला चोपडा रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा श्वास सुरू होता. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर होती म्हणून तिला नशिराबाद येथे गोदावरी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तिला पुढील उपचारसाठी गोदावरी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. मुलगा निलेश याने फिर्याद दिल्यावरून अडावद पोलीस स्टेशनला नारायण विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहा पोलीस निरीक्षक दांडगे यांनी तपस केला.हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात आरोपीचा मुलगा निलेश , भाऊ ,पुतण्या आणि डॉ प्राची सुरतवाला , डॉ वैभव सोनवणे यांची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी नारायण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी गरिब असल्याने त्याला न्यायालयाने दंडाची शिक्षा नाकारली. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील व अशोक साळुंखे यांनी काम पाहिले