जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुध संघाची निवडनुकीची धामधूम सुरु आहे नुकतीच काल दि १० रोजी उमदेवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी उमेदवार अर्जांची छाननी होणार आहे. गिरीश महाजन राज्याचे मंत्री आहेत, मात्र त्यांनाही जिल्हा दूध संघाची सत्ता खुणावत असल्याने या दूध संघात आहे तरी काय, याची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज विक्री व भरण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गुरुवारी १२ अर्जांची विक्री झाली, तर तब्बल १७९ उमेवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
दूध संघाच्या संचालकपदासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गट शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी सौ.छाया देवकर,मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूकीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगरातून आमदार चव्हाण यांचा अर्ज
भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुका मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे.त्या सोबतच त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अर्ज दाखल केला आहे. दुसऱ्या तालुक्यातील मतदार संघात अर्ज दाखल करणारे ते एकमेव उमेदवार आहेत.