हिवाळ्यात सर्दी खोकला यासह विविध होणारे आजार हे व्हायरल असून ते तुम्हाला तुमचा मूळ आजार उद्ब्विणार असल्याची जाणीव करून देत असतात. हिवाळ्यात कुठलाही आरोग्याबाबत त्रास होत असल्यास लागलीच डॉक्टरांना दाखवावे कारण तुमच्या या प्राथमिक व्हायरल हे तुमच्या मुळ आजारापर्यत जावू शकतो तसेच हिवाळ्यात सर्वात धोकादायक हृदयविकाराचा झटका असतो. याचा धोका हिवाळ्यात जास्त वाढतो. या धोक्यातून वाचण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
या लोकांना असतो सर्वाधिक धोका
एका संशोधनानुसार ज्या लोकांचं वजन जास्त आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा लोकांना हिवाळ्यात ३० पट हृदयविकाराचा धोका वाढतो.
थंडीत आपल्या नसा आकुंचन पावल्याने दबाव वाढतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू लागतं. बीपी वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता वाढतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात थंडीमुळे रक्त घट्ट व्हायला लागतं. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
सकाळी धोका अधिक
हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण हिवाळ्यात बहुतांश वेळा सकाळी असतं. सकाळी वातावरण गार असल्याने शरीराचं तापमान पण कमी झालेलं असतं. अशात शरीराचं तापमान वाढवण्यासाठी बीपी वाढतं. त्यामुळे हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतो
सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान फिरायला जाऊ नये. ९ वाजेनंतर जावं.
मीठ कमीत कमी खावं
उन्हात जास्तीत जास्त वेळ घालवा.
रोज थोडीफार एक्सरसाइज करा.
डाएट कंट्रोलमध्ये ठेवा. तळलेलं, गोड खाऊ नका.
गरम कपडे वापरा. स्वतःला कपड्यांनी झाकून गरम ठेवणं फार आवश्यक असतं.
नियमित बीपी तपासा. विशेषतः उच्च रक्तदाबाच्या लोकांनी ही काळजी घ्या.