धरणगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धरणगावतर्फे पदाधीकाऱ्यांची धावडा पंपिंग स्टेशनं येथे भेट देण्यात आली. तसेच धरणगावातील वेगवेगळ्या समस्या जसे पाणी समस्या, रस्त्याचा लाईट च्या बाबतीत धरणगाव न पा तील मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तसेच धरणगाव तहसीलदार साहेब यांना पाटाचे पाणी सोडण्या बाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांसाठी रगबी हंगाम च्या पिकांना पाणी 15 नोव्हेंबर च्या आत पाणी सोडावे जेणे करून शेतकरी बांधवांना वेळेवर पीक घेण्याचे लाभ मिळावे व असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ता कार्याध्यक्ष अरविंद देवरे, तालुका अध्यक्ष धनराज माळी, शहर अध्यक्ष निलेश चौधरी, यु ता अध्यक्ष मनोज पाटील, यु श अध्यक्ष संभाजी कंखरे, सो मि प्रमुख सागर वाजपेयी, सीताराम मराठे,सुमित मराठे, नारायण चौधरी,भूपेंद्र पाटील,दिनेश भदाणे, अजय महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.