Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यंदाच्या हिवाळ्यात ‘पाच’ फळ खावून रहा निरोगी…
    आरोग्य

    यंदाच्या हिवाळ्यात ‘पाच’ फळ खावून रहा निरोगी…

    editor deskBy editor deskNovember 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. विशेषत: हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे. कारण फळांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

    अनेकजणांना हिवाळ्यात कोणती फळे खावीत? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खाणारी काही खास फळे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

    सफरचंद- सफरचंद खरं तर बाराही महिने मार्केटमध्ये असते पण त्याचा खरा हंगाम हा हिवाळ्यात असतो. असं म्हणतात की दररोजचे एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. हे खरंय आहे. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यातील फायबर, व्हिटीमिन्स C आणि K आपल्या शरिराला मुबलक उर्जा देतात.

    पेरू- पेरू हा खरं तर हिवाळ्यात येतात. सर्दीमुळे अनेकजण पेरू खाणे टाळतात पण पेरुमध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शक्यतो पेरू खावेत.

    डाळिंब- थंडीच्या दिवसात डाळिंब खाणे आरोग्यासाठी उत्तम असतं. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता तर दूर होतेच सोबतच वजन कमी करण्यासही डाळींब महत्त्वाची भूमिका बजावतो.

    गाजर – हिवाळ्यात गाजर आवश्यकच आहे. हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. गाजरमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

    आवळा- आवळा हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळ आहे. आवळ्याचा रस दररोज पिल्याने केस आणि डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. लिव्हरसाठीही आवळा खूप फायदेशीर आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.