मुंबईः वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसा आधी आ.कडू व रवी राणा यांचा मोठा वाद सुरु होता तो वाद जरी कमी झाला असला तरी आ.कडू यांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मजूर केल्याचा एका मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. देशपातळीवर हा मोठा निर्णय असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
दिव्यांगांसंदर्भात कालच मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली. याच बैठकीमध्ये राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देशात पहिल्यांदाच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. आपण आज मंत्रालयासमोर लाडू वाटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.