लोक उपवास धार्मिक म्हणून तर काही लोक उपवास म्हणजे वजन कमी करण्यासाठी करतात, पण यामध्ये थोड्या काळासाठी उपवास केल्याने लोकांना कमी कॅलरीज खाण्यास मदत होते आणि वजन कमी होऊ लागते. हा एक नियमित आणि अल्पकालीन उपवासाचा एक नमुना आहे. अनेक अभ्यासांतून दिसून आले आहे की, अधूनमधून उपवास केल्याने ८ आठवड्यात सरासरी ३ ते ७% वजन कमी होऊ शकते.
अधूनमधून उपवासाच्या पद्धती जाणून घ्या
१६/८ पद्धत : १६ तास उपवास, ८ तासांत खा १६/८ उपवास पद्धतीनुसार वजन कमी करण्यासाठी दिवसाचे १६ तास उपवास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी उर्वरित ८ तासांच्या आत अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जेवणासाठी दिवसाचे कोणतेही ८ तास निवडण्यास मोकळे आहात. एका अभ्यासानुसार, १६/८ उपवास केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
५/२ पद्धत : ५ दिवस सामान्य, २ दिवस कमी जेवण ५/२ पद्धतीचे अनुसरण करणारे आठवड्यातून पाच दिवस सामान्य आहार घेतात, पण आठवड्याच्या इतर दोन दिवसांत ते उरलेल्या दिवसांच्या तुलनेत एकचतुर्थांश कॅलरी कमी करतात. एका अभ्यासानुसार, ५/२ पद्धत ही मधुमेह नियंत्रित करण्यासाठी रोजच्या आहाराइतकीच प्रभावी आहे. तुम्ही याचा अवलंब कराल तेव्हा जास्त खाणे आणि जंक फूडपासून दूर राहा.
द वॉरियर डाएट : २० तास कमी जेवण करा या पद्धतीनुसार, तुम्हाला दिवसातील २० तास कमी प्रमाणात अन्न घ्यावे लागते आणि उरलेल्या ४ तासांमध्ये तुम्ही हवे तेवढे खाऊ शकता. आहारानुसार, एखाद्या व्यक्तीने दिवसाच्या २० तासांमध्ये थोड्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ आणि हिरव्या भाज्या तसेच द्रव आहार घेतला पाहिजे. अभ्यास दर्शवतो की, वॉरियर डाएटच्या मदतीने मधुमेहाचा धोका कमी होतो.
ईट स्टाॅप ईट : आठवड्यात दोन दिवस न खाता राहा या पद्धतीत आठवड्यातून एक किंवा दोन दिवस २४ तास काहीही न खाता राहावे लागते. असे सलग दोन दिवस करू नये. या २४ तासांमध्ये तुम्ही पूर्णपणे खाणे टाळता. दुसरीकडे उर्वरित आठवड्यात आपण आपल्या मर्जीनुसार खाऊ शकता, परंतु अशा परिस्थितीत जास्त खाणे टाळा.
अल्टरनेट-डे फास्टिंग : दर दुसऱ्या दिवशी उपवास या डाएटमध्ये दर दुसऱ्या दिवशी उपवास केला जातो, पण उपवास नसलेल्या दिवशी तुम्ही हवे ते खाऊ शकता. एका संशोधनानुसार, ४ आठवड्यांच्या कालावधीत ३६ तास उपवास आणि १२ तास जास्त खाल्ल्यानंतर ३५ टक्के लोकांचे वजन ३.६ किलो कमी झाले होते.