Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आली लहर केला कहर ; फिल्मी स्टाईल बिअरचा ट्रक लुटला !
    क्राईम

    आली लहर केला कहर ; फिल्मी स्टाईल बिअरचा ट्रक लुटला !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 9, 2022Updated:November 9, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    50 ‘खोके’ नाही तर तब्बल… एवढे खोके पळवून नेले

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ते म्हणता ना चोरी करायची तर मोठी करा छोटी नको म्हणजेच आली लहर आणि केला कहर याच प्रमाणे नाशिक महामार्गावर चोरटयांनी डायरेक फिल्मी स्टाईल बिअरचा ट्रक लुटला आहे. नाशिक महामार्गावर लुटीचा थरार पहायला मिळाला आहे. चोरट्यांनी बिअरच्या बॉटल्स घेवून जाणारा कंटेनर लुटला आहे. बिअर बॉटलचे 2200 बॉक्ससह जवळपास 63 चोरट्यांनी अगदी फिल्मी स्टाईलने ही लुट केली आहे. यामुळे या बियर चोरीची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद येथे असलेल्या किंगफिशर कंपनीचा एक कंटेनर बियरच्या बॉटल घेऊन निघाला होता. या कंटेनकर मध्ये बिअर बॉटलचे 2200 बॉक्स होते.

    बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर नाशिकमधील घोटी येथे पोहचताच चोरट्यांनी डाव साधला. ड्रायव्हरला बेशुद्ध करून 43 लाख 30 हजार रुपये किमतीची बिअर आणि कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल जबरदस्ती लुटला.

    याना केली अटक

    गुन्हा नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका मोठ्या टोळक्याने हे कृत्य केले आहे. सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. गुड्डू, निलेश, सरदार, पप्पू, विकी, जिसान आणि इतर काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.

    असा लुटला कंटेनर

    आरोपींनी रस्त्यातच हा कंटेनर अडवला. यानंतर आरोपींनी कंटेनर ड्रायव्हरचे तोंड रुमालाने दाबुन त्याला बेशुध्द केले. यानंतर कंटेनर आणि बियरचे बॉक्स आपल्या ताब्यात घेत आरोपींनी ड्रायव्हरला नाशिकच्या एका बिल्डींगमध्ये डांबुन ठेवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.