धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगोणे बु येथे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धरणगाव तालुक्यात प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यात आली.तसेच मौजे हिंगोने बु येथे चुनाव पाठशाळा आयोजित करण्यात आली त्याअनुषंगाने गावातील मतदारांनी यादी बघून दुरुस्ती असल्यास तात्काळ करून घेण्याचे आवाहन तहसीलदार देवरे यांनी कवळेले आहे.
तसेच दिनांक 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे,त्याबाबत ज्यांची मतदार नोंदनी अद्याप झालेली नाही त्यांनी करून घ्यावे अशी माहिती देवरे यांनी दिली आहे. तसेच आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी सम्पर्क करावा असे आवाहन केले आहे. या प्रसंगी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सचिन पाटील निवडणूक ऑपरेटर महेंद्र पवार हजर होते.