मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गेल्या 100 दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.
गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार अखेर आज राऊत यांना जामीन मिळाला.