मुंबई : वृत्तसंस्था
पुढील 3 दिवसांत आपण अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करू, अशी घोषणा दीपाली सय्यद यांनी केली आहे. दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, असे दिपाली सय्यद म्हणाल्या.
दिपाली सय्यद म्हणाल्या, शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होईल. तो कसा होईल, कुठे होईल, याची चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती स्वीकारण्यास मी पुर्णपणे तयार आहे.