Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सराफाची दुकान फोडली ; गुन्हा दाखल
    क्राईम

    जळगावात सराफाची दुकान फोडली ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskNovember 9, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्सच्या शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचे दागिने तसेच २० हजाराची रोकड असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडकीस आली. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यावर नेहमीप्रमाणे सर्व जण घरी गेले. मंगळवारी सकाळी साडे सात वाजता शेजारील कमल ज्वेलर्सचे मालक कमल शर्मा यांनी ललीत यांना फोन करुन दुकान उघडे व शटरची पट्टी तुटलेली असल्याचे कळविले.
    ललीत यांनी दुकानात धाव घेतली असता शटर्सच्या पट्ट्या व लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले होते. सीसीटीव्हीची वायर कापण्यात आली होती व डीव्हीआर काढलेला दिसला. दुकानाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली २० हजाराची रोकड तसेच ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातल्या १२ जोडी, सोन्याच्या पेंडलचे १२ नग, एक किलो चांदी त्यात विविध प्रकारचे नगर आदी ऐवज चोरी झालेला होता.
    घटनेची माहिती मिळताच शनी पेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार रवींद्र पाटील, संजय शेलार, अनिल कांबळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपअधीक्षक संदीप गावीत यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच ठसे तज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, ललीत वर्मा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.