मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील तरुणांना शिंदे सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली होती परंतु स्थगित झाल्याने राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सुमारे 18 हजार331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निरणय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजेच कोरोना काळात अर्ज केलेल्या आणि ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे.
पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या – 21,764 जागा शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 महत्वाच्या जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत.
अ-उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकतात. 1- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकच अर्ज करावा. 2 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करावा. 3 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही ‘रा. रा पोलीस शिपाई’ या पदासाठी एकच अर्ज करावा. 4 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई लोहमार्ग या पदासाठी एकच अर्ज करावा. सूचित ब)-वरील क्र-1/क्र-2/क्र-3/क्र-4 असे चार अर्ज एक उमेदवार करू शकतो. सूचित क)-वरील-क्र-1 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास,क्र-2 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास ,क्र-३ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास क्र-4 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास,भरती प्रक्रियेतून कोणत्याही क्षणी बाद करण्यात येईल.
(टीप- प्राथमिक माहितीनुसार, उपलब्ध बातमी देण्यात आली आहे. सविस्तर आणि अधिकृत माहिती राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून घ्यावी)