जळगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनातील ऐतिहासिक घटनांवर आधारित दिग्दर्शक व लेखक अभिजित देशपांडे यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ” हर हर महादेव ” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे . जळगावातील आयनॉक्स थिएटरमध्ये मध्ये हर हर महादेव हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता पण तत्पूर्वी थिएटरच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा करून त्यांना चित्रटातील आक्षेपार्ह घटनांची कल्पना देण्यात आली व चित्रपट प्रदर्शित करू नका अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आली . थिएटरच्या मॅनेजर यांनी विनंती मान्य करत सदर चित्रपट या थिएटर मध्ये प्रदर्शित करण्यात येणार नाही याविषयी आश्वासन दिले व आज पेक्षकांनी काढलेल्या तिकिटांची रक्कम त्यांना परत करण्यात आली .
सदर चित्रपटात दाखविण्यात आलेले अनेक घटना या छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे , इतकेच नाही तर छत्रपतींचे निष्ठावंत सरदार बांदल यांचे विषयी चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग बदनामीकारक आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दस्तुरखुद्द छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सदर चित्रपटास विरोध दर्शवलेला आहे . त्यामुळे जळगावला हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे .
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , सुनिल माळी , अमोल कोल्हे , पुरुषोत्तम चौधरी, इब्राहिम तडवी सर , रिंकू चौधरी , किरण राजपुत , अनिल पवार , उज्वल पाटील , साजिद पठाण , प्रमोद पाटील , कुंदन सुर्यवंशी , राहुल टोके , हितेश जावळे , भीमराव सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .