जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या २२ वर्षीय तरुणी दि. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात होती. यावेळी संशयित आरोपी विजय दिलीप पाटील याने तरुणीस बोलला की, तू माझ्यासोबत चल आणि माझ्याशी संबध ठेव नाही तर, तूला उचलून नेईल. एवढेच नव्हे तर हात ओढून तरुणीला लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी संशयित आरोपी विजय पाटीलसह दोन तरुणांवर पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.