मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात शिंदे गटाच्या मंत्रीने केलेल्या वादग्रस्त राष्ट्रवादीने राज्यभर निदर्शने करीत असतनाच विदर्भात ठाकरे गटाला मोठ खिंडार पडल आहे. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदे गटाने विदर्भात ठाकरे गट फोडल्याचे दिसून आले आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईं यांच्या युवा सेनेला सुरुंग लावण्याचं काम केलं आहे.
पूर्व विदर्भातील म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भातील तरुण कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जात असल्यामुळे त्यांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात किरण पांडव यांनी ‘ॲापरेशन युवा सेना’राबवलं आहे. यामध्ये त्यांना मोठं यश मिळल्याचं दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत लवकरच सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत.
युवासेनेचे हर्षल शिंदे, दिपक भारसागडे, कगेश राव, शुभम नवले, रोशन कळंबे, नेहा भोकरे, सोनाली वैद्य हे जिल्हाप्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.