जळगाव : प्रतिनिधी
२०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवलेले रमेश माणिक पाटील यांनी आज ठाकरे गटात प्रवेश करीत सर्वानाच मोठा धक्का दिला आहे.
रमेश माणिक पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात आता विधानसभा ठाकरे गटाला सोपी जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. यावेळी त्यांच्यासोबत उमेश रावसाहेब पाटील, प्रवीण कौतिक पाटील, शेतकरी नेते छोटू सुकदेव पाटील, जिल्हा अध्यक्ष कोळी सेल कॉग्रेसभाऊसाहेब सुकदेव सोनवणे, प्रहार जिल्हा नेते डॉ०.जुबेर खान, चेतन पुंडलिक सोनवणे ग्राम पंचायत सदस्य भोकर यांनी प्रवेश केला आहे. तर यावेळी
जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, शरद तायडे, अँड शरद माळी, राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.