जळगाव : प्रतिनिधी
धानवड व परिसर हा आमचा बालेकिल्ला असून प्रतिकूल कालावधीतही या नागरिकांनी मला सदैव साथ दिली आहे. त्यामुळे टिकाकारांना आम्ही विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देत असतो. धानवड व परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी अपुरा पडू देणार नसून स्व. रावसाहेब पाटील यांनी गावाच्या विकासाठी दिलेल्या वचनपूर्तीसाठी कटिबद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते धानवड व कुसुंबा येथे सुमारे २ कोटी २५ लक्ष कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मेहरूण- पांझरपोळ -कुसुंबा – चिंचोली – धानवड -करमाड पर्यंत रस्ता डांबरिकरण करण्यासाठी ३ कोटी ८० लक्ष र एवढा निधी मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराचे सुशोभीकरणासाठी व शाळा खोल्या बांधकामासाठी निधी मंजूर करणार असल्याचे सांगितले. स्व.रावसाहेब पाटील यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. युवकांसाठी व्यायाम शाळा बांधकाम करण्याबाबतचा ग्रामपंचायतिने तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे करण्याचे निर्देश ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
यावेळी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, विभाग प्रमुख देविदास कोळी, डॉ. कमलाकर पाटील , रमेशआप्पा पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली.
धानवड येथे विविध विकास कामांचे झाले भूमिपूजन
धानवड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना (१ कोटी १५ लक्ष ), डीपीडीसी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे ( २२ लक्ष ) , मुलभूत सुविधेंअंतर्गत गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे (२० लक्ष ), स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे ( १० लक्ष ) अश्या एकूण १ कोटी ६८ लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यकर्त्यांची मांदियाळी
कार्याक्रामाचे प्रास्ताविकात जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा युवासेनेचे शिवराज पाटील यांनी युवकांसाठी व्यायामशाळा व छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरणसाठी निधीची मागणी करून मंजूर कामांबाबत पालकमंत्र्यांचे आआभर व्यक्त केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक डिगंबर पाटील यांनी केले तर आभार अमोल पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाला याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी , मुकुंदराव नन्नवरे, संजय गांधी निराधार योजनेचे रमेशआप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगावडे , उपाभियांता सुनील बोरकर, शाखा अभियंता सुनील मोरे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, पंकज पाटील, माजी नियोजन समिती सदस्य श्याम कोगटा, सरपंच संभाजी पवार, उपसरपंच दिलीप पाटील, कुसुंबा सरपंच सौ. यमुनाबाई ठाकरे माजी सरपंच प्रदिप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, माजी उपसभापती, डॉ . कमलाकर पाटील, समाधान चिंचोरे, पी. के. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, संचालक अनिल भोळे, दक्षताचे अर्जुन पाटील, मनपाचे पदाधिकारी निलेश पाटील , उमाळा सरपंच राजू पाटील, शिवाजी मांडे, देविदास कोळी, मल्हारराव देशमुख, दिपक राठोड, धनवड ग्रा. पं. सदस्य वैशाली चव्हाण, सरला पाटील, शांताबाई चव्हाण, हरीलाल शिंदे, गिताबाई चव्हाण, यशोदाबाई राठोड, मयूर पाटील, दिलीप पाटील, जनार्धन पाटील, अमोल मानके, ब्रिजलाल पाटील, श्रीराम पाटील, गोकुळआप्पा पाटील, विठ्ठल पाटील , गोलू बढे, नामदेव पाटील, मधुकर पाटील, अर्जुन चौधारी , समाधान पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, वि.का. सोसायटीचे पदाधिकारी, बाळासाहेबाच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कुसुंबा येथे रस्ते काँक्रिटीकरण भूमिपूजन
कुसुंबा येथे आमदार निधी व मुलभूत सुविधेअंतर्गत म्हणजे २५१५ मधून ५६ लाखांच्या निधीतून गाव अंतर्गत विविध रस्ते व चौकात कॉन्क्रीटीकरण कामांचेही भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची गावातून ढोल- ताश्यांच्या गजारात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच सौ. यमुनाबाई ठाकरे, माजी सरपंच भावलाल पाटील, उपसरपंच चंद्रकानत पाटील, ग्रा. पण सदस्य मीराबाई पाटील, अश्विनी पाटील, रामदास कोळी, प्रमोद घुगे, यासीन तडवी, बेबाबाई तडवी, श्रावण कोळी, निलेश ठाकरे, आकाश पाटील,व अशोक पाटील , ग्रामसेवक जयपाल चिंचोरे आदी उपस्थित होते.
*अशी असेल धानवड पा.पु.योजना*
जलजीवन मिशन अंतर्गत धानवड येथे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी १ कोटी १५ लक्ष रुपये निधीच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असून या योजनेत उद्भव विहीर, पंपगृह, पंपिंग मशीन, उद्धरण नलिका, १ लाख ६० हजार लिटरची पाण्याची टाकी, गावांतर्गत पाईपलाईन वितरण व्यवस्था, या बाबींचा समावेश आहे. गावाच्या पुढील ३० वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून योजना मंजूर करण्यात आली आहे.
गावाचे विकासाचे व्हिजन साध्य करण्यासाठी गावाचा एकोपा,
गावातील विकास कामात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
गावातील विकास कामे करताना येणाऱ्या अडचणी येत असतात. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामे करण्यासाठी प्रामानिक प्रयत्न करतात.होणारी विकास कामे ही सर्वांच्या फायद्याची असतात.त्यासाठी गावातील नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे,